नाशिक : शहरात हेल्मेट सक्ती करू नये, अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती संघटनेच्या वतीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. हेल्मेट सक्तीमुळे मोटारसायकल चालकांना विविध मानसिक, शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हेल्मेट सक्तीमुळे मोटारसायकल चालकांना मान वळविताना समस्या येतात. हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. मान व मणक्याचा त्रास असणाऱ्यांना हेल्मेटमुळे चक्कर येतात. हेल्मेट परिधान करून भुरटे चोर महिलांचे दागिने ओरबाडतात. हेल्मेटमुळे चोरट्यांनी ओळख पटत नाही. हेल्मेट नसल्याने जे मोटारसायकलस्वार मुत्युमुखी पडले, त्यापैकी ५० टक्के व्यसनाधीन असल्याचा दावा निवेदनात करण्यात
आला आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती असू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अविनाश आहेर, राम ठाकूर, सूर्यकांत आहेर, रेणुका कोकणे, रेखा शेलार, अंजली वैद्य, आदींसह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.