ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली.स्व. यशवंतराव चव्हाण यांना नाशिक मतदारसंघातून लोकसभेवर बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी नाशिकच्या जनतेचे ऋण फेडण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील अग्रनीय लढाऊ विमान निर्मिती कारखाना ओझर, नाशिकला भेट म्हणून दिला होता. त्यामुळे नाशिकची देशामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.ही आठवण जनतेच्या स्मरणात राहावी याकरिता एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे (१२ मार्च) औचित्य साधत कृतज्ञता म्हणून, त्यांच्या सन्मानार्थ एचएएल मेन गेटवर स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभा करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र कामगार संघटनेच्या वतीने नुकतेच व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण यांंचा पुतळा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 22:39 IST
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण यांंचा पुतळा उभारण्याची मागणी
ठळक मुद्देएचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार कामगार संघटनेचे निवेदन