शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

सिन्नर औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी सुमारे चार एकरचा भूखंड आरक्षित केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करूनही उपयोग होत ...

सिन्नर औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी सुमारे चार एकरचा भूखंड आरक्षित केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही. आता मात्र हा भूखंडच विकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उद्योजकांनी आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा भूखंड विकसित करण्याबाबत कुठलेही पावले उचलले नाहीत. ट्रक टर्मिनलअभावी वसाहतीत अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे. हा भूखंड विकसित करण्यासाठी माळेगाव ग्रामपंचायतीने एमआयडीसीला प्रस्तावदेखील दिला आहे. मात्र, अशातही त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कृती झाली नाही. उलट भूखंड विकण्याचा प्रयत्न होत आहे.

माळेगाव एमआयडीसीत केएसबी पंप्स, जिंदाल सॉ, भगवती स्टील अशा मोठ्या कंपन्यांचे जाळे आहे. या कंपन्यांमध्ये येणारा माल तसेच उत्पादन बाहेर पाठविण्यासाठी अवजड वाहनांची नियमित वाहतूक होत असते. यामुळे अपघाताच्या घटना होत असल्याने तातडीने या भागात ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रतन पडवळ, बबन वाजे, राजेश गडाख, अजय बाहेती, आशिष नहार, प्रवीण वाबळे, राहुल नवले, सुधाकर देशमुख, अतुल अग्रवाल, रवि पाटील, मारुती कुलकर्णी, पंकज निकम, संजय राठी, किरण वाजे आदींसह उद्योजकांनी केली आहे.

फोटो :

सिन्नरच्या राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याच्या मागणीचे निवेदन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देताना रतन पडवळ, बबन वाजे, राजेश गडाख, आशिष नहार, प्रवीण वाबळे, राहुल नवले, सुधाकर देशमुख, अतुल अग्रवाल, किरण वाजे आदी.