नाशिक : नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभा अधिवेशानामध्ये पुरवणी मागणी करताना केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात विचार विनिमय करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.विदर्भ व मराठवाड्यास उद्योगांसाठी वीज दरात सवलत देण्यात आलेली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी १७५ कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु ती अत्यल्प असून, त्यात अजून ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीची गरज आहे. नाशिकमधील स्टील इंडस्ट्रीजमध्ये ९ ते १० मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे माध्यमातून ४५० कोटी रु पये प्रतिवर्ष वीज बिल भरले जाते. त्यामुळे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचार विनिमय करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची मागणी
By admin | Updated: July 26, 2016 23:52 IST