शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी

By admin | Updated: April 7, 2017 23:08 IST

सिन्नर : आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 सिन्नर : पंडित दीनदयाळ योजनेस स्थगिती देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे, उल्हासनगर येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे बंद करण्याचे आदेश प्रकल्प कार्यालयातून गृहपालांमार्फत देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे निवेदन म्हटले आहे.आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेत सातत्य नाही. निर्वाह भत्ता वेळेत मिळत नाही, शिष्यवृत्ती वेबसाइट शैक्षणिक वर्ष संपले तरी चालू होत नाही यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दीनदयाळ योजनेची रक्कम खात्यावर वेळेत जमा न झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून गावी परतावे लागण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हातातील पुस्तके बाजूला ठेवून वसतिगृहे वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष देवराम खेताडे, महिला प्रतिनिधी यमुनाबाई भांगरे, कार्याध्यक्ष भगवान तळपाडे, शहराध्यक्ष रोहित मुठे, विजय मुठे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)