शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवा नियमित सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:58 IST

दोन दिवसांपूर्वी शहर बसच्या चालक, वाहकांनी अचानक बस बंद आंदोलन केल्याने नागरिकांचे झालेले हाल पाहता शहराची बससेवा पूर्ववत व व्यवस्थित चालवावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

नाशिक : दोन दिवसांपूर्वी शहर बसच्या चालक, वाहकांनी अचानक बस बंद आंदोलन केल्याने नागरिकांचे झालेले हाल पाहता शहराची बससेवा पूर्ववत व व्यवस्थित चालवावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यासंदर्भात एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, एसटी कर्मचाºयांना रास्त वेतन, कामाचे नक्की तास, नोकरीची सुरक्षितता, दुरुस्ती या कर्मचाºयांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्या या मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्यात यावा. शहर बससेवा तोट्यात असल्याचे प्रशासन नेहमीच सांगत असले तरी, सार्वजनिक उद्योग नीट चालविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. तोटा होणे हे कारण म्हणजे प्रशासनाचे नियोजन, वचक नसल्याचा पुरावा आहे. शहर बससेवेच्या त्रुटींमुळे शहरातील नागरिकही त्रस्त झाले असून, सामान्य व्यक्ती, विद्यार्थी बसने प्रवास करतात अशा परिस्थितीत शहर बससेवा बंद करणे योग्य नसल्याचे माकपने म्हटले आहे.  शहरातील बससेवा पूर्ववत चालू ठेवा, बसफेºया वाढवा, सर्वस्पेअर पार्ट व अन्य आवश्यक गोष्टींचा पुरवठा ठेवून बसेस दुरुस्त ठेवा, शहर बससेवेतील तोट्याची खरी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करून तोटा नियंत्रित करण्याचे काम करा, शहर व परिसरातील ग्रामीण भागात पुरेशी प्रमाणात बससेवा त्वरित उपलब्ध करून द्या, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. डी. एल. कराड, वसुधा कराड, सीताराम ठोंबरे, मोहन जाधव, भागवत डुंबरे, सिंधू शार्दुल, संजय पवार, सतीश खैरनार, कल्पना शिंदे आदींच्या स्वाक्षºया आहेत.