सटाणा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह बांधण्यात यावे या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना आंबेडकर नगरातील रहिवाशांकडून निवेदन देण्यात आले.आंबेडकर नगर आणि भुतेकर नगर या भागातील रहिवाशांच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी पालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून नवीन सभागृह किंवा सभामंडप बांधण्यात आलेला नाही. काही वर्षांपूर्वी आंबेडकर नगरात सभागृह बांधण्यात आले होते. आज त्याची दुरवस्था झाली असून ती जागाही लोकसंख्येच्या दृष्टीने कमी आहे. या भागातील रस्तेही लहान आहेत, त्यामुळे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यास अडचण होते. ही गैरसोय लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.या वेळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच आपल्या मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बच्छाव, जिभाऊ बच्छाव, बाळू पवार आदींनी निवेदन दिले. या वेळी गटनेते महेश देवरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नगरसेविका संगीता देवरे उपस्थित होते.
व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:41 IST
सटाणा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह बांधण्यात यावे या मागणीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना आंबेडकर नगरातील रहिवाशांकडून निवेदन देण्यात आले.
व्यापारी संकुलावर सामाजिक सभागृह बांधण्याची मागणी
ठळक मुद्देसटाणा : नगराध्यक्षांना नागरिकांचे निवेदन