शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड कालवा पुलावरील संरक्षित कडे बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 19:43 IST

पाटोदा : गेल्या आठ दिवसांपासून पालखेड कालव्यास आवर्तन सुरु आहे.या कालव्याच्या ठाणगाव सीमेवरील पुलाचे संरक्षण कडे गेल्या काही वर्षांपासून ...

ठळक मुद्दे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला

पाटोदा : गेल्या आठ दिवसांपासून पालखेड कालव्यास आवर्तन सुरु आहे.या कालव्याच्या ठाणगाव सीमेवरील पुलाचे संरक्षण कडे गेल्या काही वर्षांपासून खचल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने कालवा विभागाने या ठिकाणी त्विरत संरक्षण कडे बांधून होणारे अपघात थांबवावेत अशी मागणी होत आहे.पाटोदा ठाणगाव सीमेवर शेळके वस्तीनजीक रस्त्याला समांतर पूल बांधलेला आहे.या ठिकाणी पूल व कालव्याची खोली सुमारे पस्तीस फुटाच्या आसपास आहे. या पुलाचे संरक्षण कडे गेल्या चार पाच वर्षांपासून तुटले आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस वाहन चालकांच्या हे लक्षात येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे.या ठिकाणी अपघात होऊन काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र पालखेड पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी पसरली आहे. मागील मिहना दीड मिहन्यपुर्वीही या ठिकाणी अपघात होऊन ट्रक्टर या पुलावरून कोसळून कालव्यात पडला होता. असे असतांना व वारंवार मागणी करूनही या ठिकाणी पूल दुरु स्ती व संरक्षण कडे बांधले जात नसल्याने हा विभाग आणखीव अपघात व बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी उपस्थित करीत आहे. याबाबत या भागातील काही नागरिकांनी संबधित विभागाकडे वारंवार निवेदने दिलेली आहे मात्र त्यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा वाटल्या जात असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.