शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यालयाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:32 IST

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देगांधीगिरी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिटकविले निवेदन

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.देवळा तालुक्यात नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचिलत, सटाणा या संस्थेच्या खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जुन्या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याठिकाणी संस्थेने नवीन इमारत बांधावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकर्यांनी केली आहे. याकडे संस्थाचालक दुर्लक्ष करीत असल्याने दोन वर्षांपूर्वी या शाळेला गावकºयांनी कुलुप ठोकले होते. याची दखल घेत गेल्या वर्षी काही नवीन वर्ग खोल्या बांधण्यास सुरवात करण्यात आली. मात्र सदर काम वर्षांपासून रेंगाळत पडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यावेळी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तुभाऊ बोडके, अनिल भडांगे, प्रकाश चव्हान, कृष्णा जाधव, तुषार खैरनार, महेंद्र खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनाची दखल घेतली नाही काम पूर्ण करण्यासाठी मध्यंतरी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मुख्याध्यापकाना निवेदन देऊन मागणी केली होती. तरी देखील दखल घेतली जात नसल्याने आज नाशिक येथे प्रहारच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या रिकाम्या खुर्चीला या मागणीचे निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.