शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केटीवेंअर फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:24 IST

ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.

ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.महाल पाटणे जवळच्या गिरणा नदीवरील ४७ एम सी एफ टी हजार क्षमतेचा केटीवेअर बांधल्यामुळे ब्राह्मणगाव, महाल पाटणे, देवपुरपडे गिरणा काठालगतच्या शेतकºयांना शेती सिंचनसाठी या पाण्याचा चांगला उपयोग होत होता.चार वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसाने व पाटबंधारे खात्याने केटीवेअर च्या फळ्या न काढल्याने पाण्याचा प्रचंड लोट येऊन धांद्री शिवारात सदर पाणी घुसून तेथील दोन शेतकºयांचे मका पिक वाहून गेले होते. त्यावेळी परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे खात्याकडे तक्र ार करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास भाग पाडले होते. सदर पंचनाम्या नंतर पाटबंधारे खात्याने उन्हाळ्यात नदी कोरडी असताना या ठिकाणी कॉँक्र ीट मध्ये ५० ते ७० फुटापर्यंत धक्का भिंत बांधणे गरजेचे होत.े परंतु खात्याकडून तसे काहीही करण्यात आले नाही. म्हणून त्यावेळी माजी जी. प. सदस्य पप्पू बछाव व केदा आहेर यांनी वाहने पुरवून व परिसरातील शेतकºयांनी लोकवर्गणीतून डिझेल खर्च करीत मातीचाबांध त्या ठिकाणी बांधला होता.या वर्षी गिरणा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच आॅगस्ट रोजी सदर बांध त्याच ठिकाणी फुटल्याने पुन्हा जवळील त्याच शेतकºयांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरी पाटबंधारे खात्याने सप्टेंबर महिन्यानंतर पाणी आडवण्यासाठी व परिसरातील शेतकºयांच्या शेती सिंचनासाठी त्वरित बांध बांधणे गरजेचे आहे. मे महिन्यापर्यंत पाटबंधारे खात्याने या कामाचा प्रस्ताव तयार करून या ठिकाणी बांधून देण्याचे व नुकसानग्रस्त शेतकºयांना पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. अहिरे यांनी केली आहे.(फोटो ०८ बंधारा)