शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

अलंगुण : सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी ...

अलंगुण : सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने नायब तहसीलदार रावसाहेब बकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात, नागली, वरई या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले; मात्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्याने आधीच कोविड-१९ने प्रभावित झालेला बळीराजा दुहेरी संकटात सापडून आर्थिक मेटाकुटीला आला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुका किसान सभेचे अध्यक्ष रामजी गावीत, सेक्रेटरी भिका राठोड, पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावीत, पंचायत समिती सदस्य विजय घंगळे, माजी सदस्य संजय पवार, देवीदास देशमुख, सरपंच कॉम्रेड भारती चौधरी, उपसरपंच संतूभाई पालवा आदींच्या सह्या आहेत.

फोटो : ०५ किसान सभा

नायब तहसीलदार बकरे यांना निवेदन देताना किसान सभेचे तालुकाध्यक्ष रामजी गावीत, सेक्रेटरी भिका राठोड, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावीत आदींसह कार्यकर्ते.

===Photopath===

051220\05nsk_5_05122020_13.jpg

===Caption===

नायब तहसीलदार बकरे यांना निवेदन देताना किसान सभेचे तालुका अध्यक्ष रामजी गावित, सेक्रेटरी भिका राठोड, सभापती मनिषा महाले, उपसभापती इंद्रजीत गावित आदींसह कार्यकर्ते.