शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एचएएलमधील ५२ कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 23:07 IST

ओझर टाउनशिप : येथील एचएएल व्यवस्थापनाने कारखान्यातील ५२ कामगारांच्या कानपूर, लखनऊ येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम यांनी एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : भाजपने दिला आंदोलनाचा इशारा

ओझर टाउनशिप : येथील एचएएल व्यवस्थापनाने कारखान्यातील ५२ कामगारांच्या कानपूर, लखनऊ येथे केलेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे यतीन कदम यांनी एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.एचएएल व्यवस्थापनातर्फे नाशिक डिव्हिजन (ओझर) कारखान्यातील सुमारे ५२ कामगारांच्या बदल्या लखनऊ, कानपूर येथे करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे यतीन कदम यांनी व्यवस्थापनाने ५२ कामगार बांधवांच्या केलेल्या इतर विभागात बदल्या त्वरित थांबविण्यासाठी व व्यवस्थापनास जाब विचारण्यासाठी गेटबंदचा इशारा दिला होता.

मात्र कामगार व कामगार संघटना व व्यवस्थापन यांनी विनंती केल्यामुळे ते आंदोलन रद्द करून कामगारांच्या बदल्या रद्द करण्यासाठी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. मात्र व्यवस्थापनाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यतीन कदम यांनी भाजपच्या वतीने दिला आहे. यावेळी बोलताना यतीन कदम म्हणाले की, व गेल्या अनेक वर्षांपासून कामगार येथे काम करतात. त्यांची मुलं इथं शिकतात, घरात वयोवृद्ध आईवडील आहेत.

सध्या कोरोनाच्या महामारीत कामगारांची बदली दीड हजार किलोमीटरवर झाली तर निश्चितच त्या कुटुंबावर एक मोठे संकट ओढावणार आहे. जे तिकडचे कामगार स्वेच्छेने कानपूर किंवा लखनऊला जायला तयार असतील त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात. यावेळी व्यवस्थापकीय अधिकारी (एचआर) जितेंद्र मोरे, राहुल मोहिते यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपचे डॉ. नामदेव पाटील, दिलीप मंडलिक, किशोर कदम, नितीन जाधव, श्रीराम आढाव, सचिन आढाव, श्रीकांत अक्कर, पुष्कर जाधव, बापू चौधरी, युवराज चौधरी, विपीन जाधव, राकेश जाधव, रामगीर गोसावी, राजू भडके, संतोष सोनवणे, श्रीकांत अक्कर, रामदास सोनवणे, युवराज शेळके, सागर शेजवळ आदी उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :Ozarओझर