शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी तलाठी नेमण्याची बोपेगावच्या ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:34 IST

दिंडोरी : बोपेगाव सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र कार्यबहुल्यामुळे वरखेडा तलाठी बोपेगाव येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्काळ कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बोपेगाव ग्रामस्थानी केली आहे.

ठळक मुद्दे१ आॅगष्टपासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

दिंडोरी : बोपेगाव सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र कार्यबहुल्यामुळे वरखेडा तलाठी बोपेगाव येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्काळ कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बोपेगाव ग्रामस्थानी केली आहे.या संदर्भातउपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांचेकडे निवेदन दिले असून त्याची त्वीत अंमलबजावणी न झाल्यास १ आॅगष्टपासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात बोपेगाव वगळता सर्व सजेसाठी स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्यात आले असून एकमेव बोपेगाव सजेचा कार्यभार वरखेडा सजेकडे अतिरिक्त सोपविण्यात आला आहे. परमोरी, आंबेवणी, वरखेडा, घोडेवाडी या चार गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वरखेडा सजेचे तलाठी करवंदे यांना कार्यबहुल्यामुळे बोपेगाव सजेतील बोपेगाव, सोनजांब, गोंडेगाव या गावातील ग्रामस्थांना वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी बोपेगाव येथील तलाठी कार्यालयात गेले वर्षभर तलाठी उपलब्ध नाही. कामकाजासाठी ग्रामस्थांना वरखेडा येथे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून यासंदर्भात शासनाने तात्काळ बोपेगाव येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा अशी मागणी सरपंच वैशाली कावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यासंदर्भात ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १ आॅगष्टपासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा सरपंच कावळे व ग्रामस्थांनी दिला आहे.बोपेगाव सजअंतर्गत बोपेगाव, सोनजांब, गोंडेगाव या तीन गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तलाठी उपलब्ध करून न दिल्यास कार्यालयास कुलूप लावण्याशियाय अन्य पर्याय नाही- वैशाली कावळे, सरपंच, बोपेगाव.