नाशिक : सनातन संघटनेवर तातडीने बंदी घालण्याची मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सनातनवर बंदी घालून त्यांचे आश्रम व प्रशिक्षण केंद्रांची झडती घ्यावी. चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या संस्थेने पोलीस, शासन, पुरोगामी कार्यकर्ते, पत्रकारांना दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने घेण्यात यावे. पुरोगामी कार्यकर्ते, पत्रकारांना सुरक्षा पुरवण्यात यावी. सनातनवर बंदी न घातल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर संगीता गायकवाड, सुशांत गरुड, सम्राट सौंदाणकर, अनुप खैरनार, संतोष गायधनी, अशोक कांबळे, प्रफुल्ल वाघ, सुधीर कापसे, अॅड. बाबासाहेब ननावरे, ताराचंद मोतमल, सागर तिवडे, रिझवान खान, अॅड. बारकू देवरे यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
‘सनातन’वर बंदी घालण्याची मागणी
By admin | Updated: October 11, 2015 22:30 IST