शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: April 23, 2017 01:18 IST

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

नामपूर : बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसम नदीकाठावरील गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हरणबारी धरणातील उन्हाळी हंगामातील पिण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.हरणबारी धरणापासून ते मालेगावपर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त गावे मोसम नदीकाठावर वसलेले आहेत. या सर्वच गावांचा पाणीपुरवठा हा या धरणावर आधरित आहे. आज या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांसह मुक्या जनावरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मोसम खोऱ्यातील मोठे गाव नामपूरलाही दहा दहा दिवसा पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. मोसम नदीकाठावरील अनेक गावांत टॅँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू असून, खासगी पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आदिवासी व गरीब जनतेला हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनसुद्धा पाणीपुरवठा करण्यास हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले, तर उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर होऊन सर्वसामान्यांचे हाल कमी होणार आहेत. संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यतिन पगार यांच्यासह नामपूरच्या सरपंच सोनाली निकम, बाजीराव सावंत, दगाजी बच्छाव, सुनील अलई, शशिकांत कोर यांनी केली आहे. (वार्ताहर)