शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीतील गावगुंडांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:08 IST

देवळाली गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच टवाळखोर व गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.

नाशिकरोड : देवळाली गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच टवाळखोर व गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.  देवळालीगाव येथे चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देवळालीगाव श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर प्रांगणात मंगळवारी सायंकाळी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीमध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी, याकरिता पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हा गुन्हा हाताळावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या प्रकारचे गैरकृत्य करण्याचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये अशी कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.  तसेच देवळाली भागातील विस्कटलेली कायदा-सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी लक्ष घालावे. मोटारसायकल्स राईड्स करणाºयांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, सुलभ व मनपा शौचालयात स्वच्छतेसाठी महिला कामगारांची नियुक्ती करावी, सोमवार आठवडे बाजारात लूटमार व दादागिरी करणाºयांचा बंदोबस्त करावा, मद्यपींचा उपद्रव थांबविण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या व भावना बैठकीत ग्रामस्थ, महिलांनी बोलून दाखविल्या. बैठकीला दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, सरोज आहिरे, माजी महापौर नयना वालझाडे, श्याम खोले, अ‍ॅड. अलका थोरात, उपनिरीक्षक संध्या तेली आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी तक्रारीकरिता व विशेष करून महिलांना तक्रारीसाठी असलेले विविध मोबाइल क्रमांक, निर्भया व्हॅन आदींबाबत माहिती दिली. गोपनीय पद्धतीने चौकशी करून त्यांचा बंदोबस्त पोलीस करतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. आपल्या घरातील मुले-मुली कुठे जातात, कोणासोबत राहतात, काय करतात, मोबाइलमध्ये काय करतात याची खबरदारी पालकांनी घ्यावी, असे आवाहन केले.