शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थिएटर आॅलिम्पिकसाठी ‘संगीत देवबाभळी’ची निवड दिल्लीत महोत्सव : भारताला प्रथमच यजमानपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:45 IST

नाशिक : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाºया थिएटर आॅलिम्पिकसाठी लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाची निवड झाल्याची माहिती शुक्रवारी (दि. १) कुसुमाग्रज स्मारक येथील स्वगत सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.नाट्यकलावंतांसाठी अत्यंत महत्त्वाचा महोत्सव म्हणून थिएटर आॅलिम्पिकची ओळख आहे. दिल्ली येथील नॅशनल ...

ठळक मुद्देथिएटर आॅलिम्पिकची ओळख भारताकडे पहिल्यांदाच यजमान पद संगीत दिग्दर्शन आनंद ओक

नाशिक : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाºया थिएटर आॅलिम्पिकसाठी लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाची निवड झाल्याची माहिती शुक्रवारी (दि. १) कुसुमाग्रज स्मारक येथील स्वगत सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.नाट्यकलावंतांसाठी अत्यंत महत्त्वाचा महोत्सव म्हणून थिएटर आॅलिम्पिकची ओळख आहे. दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सव ग्रीस, जपान, मॉस्को, रशिया, तुर्की, चीन, पोलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्यानंतर आता भारताकडे या महोत्सवाचे पहिल्यांदाच यजमान पद आले आहे. जगभरात या थिएटर आॅलिम्पिकचे विशेष आकर्षण असल्याने तसेच भारताला या महोत्सवाचे यजमानपद मिळालेले असल्याने दरवर्षी भरविण्यात येणारा मानाचा भारत रंग महोत्सव वेगळा न भरवता या महोत्सवाचा समावेश थिएटर आॅलिम्पकमध्ये करण्यात येणार आहे. आगामी २०१८ स्पर्धेत या थिएटर आॅलिम्पिक स्पर्धेची ‘फ्लॅग आॅफ फ्रेंडशीप’ ही संकल्पना असून, एकूण ५० दिवसांच्या महोत्सवात देशभरातून ११००, तर विदेशातून ४५० नाटकांची निवड करण्यात आली आहे. अश्वमेध आणि स्पंदन यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे संगीत दिग्दर्शन आनंद ओक यांचे असून, नेपथ्य प्रणव प्रभाकर, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, राजेश भुसारे, तर वेशभूषा आणि रंगभूषा पूर्वा सावजी यांची आहे. या नाटकात गायिका रसिका नातू आणि शुभांगी सदावर्ते यांची प्रमुख भूमिका असून, वाद्यवृंदात पुष्कराज भगवत, सौरभ कुलकर्णी, अभिषेक दांडेकर, रोहन कानडे यांचा समावेश आहे. या संगीत नाटकाचे निर्मिती प्रमुख श्रीपाद देशपांडे, तर सूत्रधार दत्ता पाटील, सचिन शिंदे आणि सदानंद जोशी हे आहेत. थिएटर आॅलिम्पिकसाठी निवड झालेले नाशिकची कलाकृती असलेले ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक नाशिकच्या कलावंतांचं दिल्लीत प्रतिनिधित्व करणार असून, ही अभिमानाची गोष्ट असल्याची माहिती प्राजक्त देशमुख, आनंद ओक यांनी दिली.