शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन‌् कोरोनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST

सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत. आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा ...

सर्दी, खोकला, दमा, ताप आलेल्या व्यक्ती प्राणायम, दीर्घ श्वसन, कपालभाती प्राणायम करीत आहेत.

आजीने सांगितल्यानुसार दिवसातून एकदा आल्याचा किस त्यावर लिंबू रस आणि सैंधव मीठ टाकून जेवताना चावून खाण्यास दिले जात आहे. पिण्याच्या पाण्यात सोन्याची गिनीं टाकून उकळून सोसवेल इतके कोमट पाणी दिले जातेय.

नाकात खोबरेल तेलाचे दोन थेंब टाकले जात आहेत. सर्दी झाल्यास अद्रक साजूक तुपात तळून त्याचे तुकडे दिवसभर चघळावेत, अद्रक, दालचिनी, काळीमिरी, लवंग तोंडात ठेवावे, चावून खाऊ नये. त्याच्या रसाचे सेवन करावे. तुळशीचे पान आणि खडीसाखर चावून खावी. सुका मेवा, गाईचे तूप यांचा वापर करावा.

कशाचा काय उपयोग

१) खोकला आल्यास आल्याचा रस काढून त्यात मध टाकून चाटण घ्यावे त्यामुळे आराम मिळतो. तीन दिवस हा प्रयोग करावा. २) सर्दी घालवण्यासाठी साजूक तुपात अद्रक तळून घ्यावे. नंतर त्याचे तुकडे तोंडात ठेवावेत, काही वेळानंतर चावून खाऊन घ्यावे.

३) ओवा तव्यावर भाजून कापडात बांधावा. त्याने गळा, नाक आणि छाती शेकवावी. याचा लहान मुलांना फायदा होतो. कफ लवकर बाहेर पडून छाती मोकळी होते.

डॉक्टरांची प्रतिक्रिया...

आजीबाईच्या बटव्यातील औषधींपैकी बऱ्याच गोष्टी आपल्या आहारात, फोडणीत रोज असतात. गरज आहे ती अन्न ताजे आणि वेळेवर आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय खाण्याची. शिळे, थंड झालेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील पौष्टिक आवश्यक घटक कमी होतात, मग फायदा कसा दिसेल? गरज, आवड आणि सोय यातील फरक समजून आहार घ्यावा. स्वच्छतेचा आग्रह, व्यायामात नियमितता आणि काळजी हे महत्त्वाचे. त्रास काय आणि किती होतोय हे बघून औषधे वापरावीत. अतिरेक नक्कीच नको. नाकात तीळ तेल / खोबरेल तेल / वैद्यांनी सुचविलेले औषधी तेल २-२ थेंब रोज २ वेळा टाकणे फायदेशीर राहील. आजारी असो वा नसो प्रत्येकाने खूश, आनंदी अन‌् उत्साही कसे राहता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. या पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्याला निगेटिव्ह राहायला मदत करणाऱ्या असणार आहेत.

- डॉ. अपश्चिम सुगन बरंठ

आजींच्या प्रतिक्रिया...

सर्दी असल्यास रात्री हळद टाकून दूध गरम करून पिल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते. घरगुती औषधी काढा घ्यावा.

- निर्मला पवार

आमच्या लहानपणी आमची आजी घरगुती आयुर्वेदिक औषधे देत असे. त्यामुळे आम्हाला फारसे डॉक्टरकडे जावे लागत नसे. कफ झाल्यास गरम केलेले पाणी कोमट झाल्यावर प्यायला दिले जायचे. त्यामुळे उलट्या होऊन शरीरातील कफ निघून जायचा.

- चंद्रभागा सोनवणे

दोन ते तीन लीटर पाणी घेऊन त्यात लिंबूचे साल, आल्याचे तुकडे, दालचिनी टाकून पाणी उकळून घ्यावे, घरातील सर्व सदस्यांनी प्यावे. सकाळ-संध्याकाळ वाफ घ्यावी.

- लयलाबाई शेख

===Photopath===

250521\25nsk_34_25052021_13.jpg~250521\25nsk_35_25052021_13.jpg

===Caption===

निर्मला पवार~चंद्रभागा सोनवणे