शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव परिसरातील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: December 9, 2015 23:33 IST

निवेदन : नागरिकांनी घेतली उपमहापौरांची भेट

नाशिक : आडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारे निवेदन नगरसेवक मीना माळोदे यांच्यासह नागरिकांनी उपमहापौर गुरुमित बग्गा यांना दिले. सदर अतिक्रमण त्वरित न हटविल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा माळोदे यांनी दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १ मधील आडगाव येथील गट नंबर ७७२ येथे शासकीय भूखंड असून, तो विनावापर पडून आहे. सदर जागेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या, हॉटेल, गॅरेज, दुकाने यांचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय जागेवर अनधिकृतपणे शेणखताचे ट्रकही उभे केले जात असल्याने दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच जागेवर लोकांकडून अनधिकृतपणे पार्किंगचेही पैसे उकळले जातात. गट नंबर १५१४ या जागेतही गोसावी समाजाची तीन गुंठे जागा असून, त्यापैकी दोन गुंठे जागा रस्त्यासाठी संपादित करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण जागेवर अनधिकृतपणे तार कंपाउंड करण्यात आले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व दशक्रिया विधी शेडलगत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी झाल्याने अंत्यविधीला जाणाऱ्या जनतेला अडथळा निर्माण होतो. आडगावातून सय्यद पिंप्री, माडसांगवी, खेरवाडी, विंचूर गवळी या गावांना जाण्यासाठी एकच रस्ता आहे. या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा उत्पन्न होत असतो. सदर अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बालाजी माळोदे, एकनाथ पाटील मते, निवृत्ती मते, बाळासाहेब झोमान, बालाजी धोंडगे, पोपट लभडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)