नाशिक : जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या व आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत पेन्शन मिळते मात्र चार तालुक्यांत अगदी २० तारीख उलटूनही पेन्शन मिळण्यास अडचणी येतात. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबत वर्षभरापासून प्रस्ताव धूळ खात असून, यासर्व प्रलंबित प्रश्नाबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना भेटून दिला. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाने सुखदेव बनकर यांची भेट घेतानाच त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच तुम्ही आल्यामुळे पेन्शन वेळेत ५ तारखेच्या आत भेटत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र काही तालुक्यांत याबाबत अडचणी येत असल्याची हळूच तक्रारही केली.
सेवानिवृत्तांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन शिष्टमंडळाने घेतली सीईओंची भेट
By admin | Updated: January 3, 2015 01:40 IST