शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चेंबर्सच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:01 IST

सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली आहे.

ठळक मुद्देव्यापार उद्योग व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याची माहिती दिली.

 

सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहिर करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली आहे.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.महाराष्ट्र चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अडचणी मांडतांना सांगितले की,देशभरात कोरोना काळात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला व त्याकाळात सर्वच व्यापार उद्योग बंद होते.त्यामुळे अर्थचक्रही बंद झाले होते.त्याचा परिणाम व्यापार उद्योगांवर झाला आहे.या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने सरकारच्या हाताहात घालून अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री,कृषीमंत्री, ऊर्जामंत्री,आमदार,खासदार यांच्याशी पत्र व्यवहार केला.तसेच राज्यस्तरीय वेबिनारच्या माध्यमातून व्यापार उद्योग,शेतकऱ्यांशी निगडित अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. व्यापार उद्योग व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील उद्योग,कृषीसंलग्न उद्योग,वाहतूक,वीज बिलात सवलत,विदर्भात पर्यटन प्रोत्साहन योजना तसेच कोविडमुळे उदभवलेले प्रश्न यासह विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर,माजी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी,सुभाष मयेकर,गणपत बेळणेकर, चंद्रकांत मोकल,किशोर परुळेकर,सागर नागरे यांनीही चर्चेत भाग घेतला.व मागण्यांचे निवेदन दिले. 

 

टॅग्स :ChemburचेंबूरMumbaiमुंबई