शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाºयांची भूमिका ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:44 IST

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दहा हजारापैकी निम्म्याहून अधिक मतदार हे मविप्र कर्मचाºयांच्या आणि शिक्षकांच्या सभासद असलेल्या मतदारांचे असल्याचे वृत्त आहे. याच सभासद मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चर्चा सध्या निवडणुकीच्या प्रचारात सुरू आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच दहा हजारापैकी निम्म्याहून अधिक मतदार हे मविप्र कर्मचाºयांच्या आणि शिक्षकांच्या सभासद असलेल्या मतदारांचे असल्याचे वृत्त आहे. याच सभासद मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चर्चा सध्या निवडणुकीच्या प्रचारात सुरू आहे.दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून काही आजी-माजी आमदारांनी या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केल्याचे समजते. ही राजकारणाची जागा नव्हे, असे सांगत विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींना सूचक इशारा दिला होता. हाच इशारा जिव्हारी लागल्याने काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या राजकीय अस्तित्वाची लढाई समजून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मालेगावात राज्यमंत्री दादा भुसे हे सत्ताधारी पॅनलकडून तर माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव माजी जिल्हा बॅँक संचालक अद्वय हिरे हे विरोधी पॅनलकडून निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. निफाडला आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांनी सत्ताधारी व्यासपीठावर हजेरी लावत विधानसभेचे हाडवैर या निवडणुकीपुरता का होईना बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. दहा हजार मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे निफाड, बागलाण व नाशिक शहरात असल्याने या तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या आजी-माजी लोकप्रतिनिधींची नेमकी मदत कोणाला होते, यावरच जय-पराजयाचे पारडे झुकणार आहे. त्यामुळे आता या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच सत्ताधारी आणि विरोधी पॅनलचे अस्तित्व अवलंबून असल्याची चर्चा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेत नोकरीत असलेल्या कर्मचारी व शिक्षकांच्या नातलग मतदार सभासदांची संख्या तीन ते साडेतीन हजार आहे. या मतदारांंची मदत नेमकी कोणाला होते, यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार असल्याचे बोलले जाते.उरले ७२ तासमराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.१३) मतदान होत असून, त्यासाठी आता तीन दिवस अर्थात ७२ तास उरले आहेत. या तीन दिवसांत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे. १४ आॅगस्टला लगोलग मतमोजणी व संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.