शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंत्यांची नाशिकरोड कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:43 IST

शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना मंगळवारी (दि़१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या तिघांचीही नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली असून, न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़

नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना मंगळवारी (दि़१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ पी़ देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या तिघांचीही नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली असून, न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़  सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांनी पूर्ण केलेल्या रस्ता दुरुस्ती कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़  शनिवारी (दि़१३) या तिघांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि़१७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत या तिघांकडून २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता त्यामध्ये सोने, चांदी व रोख रक्कम शोधून काढण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले़ अभियंता पवार यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने असा आठ लाख २० हजार ६९४ रुपयांचा, पाटील यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने असा सहा लाख सात हजार ४५० रुपयांचा, तर देशपांडे यांच्या घरझडतीत ८ लाख ७ हजार ९३३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला़ मंगळवारी या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ यानंतर सायंकाळी वैद्यकीय तपासणीनंतर या तिघांचीही रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली़ त्यांच्या वकिलांनी त्यांचे जामीन अर्ज न्यायालयात सादर केले़वकिलांच्या युक्तिवादानंतर जामिनावर निर्णयया लाचखोर अभियंत्यांची लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार मोहिते यांच्यावर दबाव आणून धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांकडे केली आहे़ याबरोबरच पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे़ या तिघांचेही जामीन अर्ज न्यायालयास सादर करण्यात आले असून, त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जबाब तसेच आरोपी व बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालय निर्णय घेणार आहे़ त्यामुळे या तिन्ही अभियंत्यांची दिवाळी कारागृहात होणार, अशी चर्चा आहे़