शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष ४२८ मोबाईल केले एकात्मिक बालविकास प्रकल्पात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

सिन्नर : पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल कमी क्षमतेचे असल्याने ते वारंवार नादुरुस्त होण्यासह ...

सिन्नर : पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल कमी क्षमतेचे असल्याने ते वारंवार नादुरुस्त होण्यासह त्यावर नवीन पोषण ट्रॅकर ॲप अपलोड होण्यासह अडचण येत असल्याने ऑनलाइन काम करणे अवघड झाल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करून पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पात आपले ४२८ सदोष मोबाईल जमा करीत आंदोलन केले.

राज्य शासनाने २०१९ ला अंगणवाडी सेविकांना कामकाजासाठी दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून, ॲपही इंग्लिशमध्ये आहे. त्यावर काम करणे जिकिरीचे जाते. त्यामुळे शासनाने नवीन दर्जेदार मोबाईल द्यावे, मराठी ॲप विकसित करावे व मोबाईल दुरुस्तीचा खर्च प्रकल्प कार्यालयाने करावा, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या वतीने आंदोलन करीत ४८० पैकी ४२८ अंगणवाडी सेविकांनी मोबाईल पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पात जमा केले.

संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री पानसरे, बीट प्रमुख सुरेखा शिंदे, सुशीला चव्हाणके, जीजा शिरसाठ, बेबी बोचरे, मीरा सोनवणे, इंदुमती पन्हाळे, आदींच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समितीच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने दिलेले मोबाईल अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, अंगणवाडी सेविकांना काम करताना कसरत करावी लागते. या मोबाईलची गॅरंटी नाही. त्यामुळे दुरुस्तीचा चार ते पाच हजारांचा खर्च त्यांना पदरमोड करून करावा लागतो. जर दुरुस्ती केली नाही तर अधिकाऱ्यांकडून कामावरून काढून टाकण्याची भाषा वापरली जाते. त्यामुळे नाइलाजाने दुुरुस्तीचा खर्च सोसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो, असे जिल्हा उपाध्यक्ष राजश्री पानसरे यांनी सांगितले.

तालुक्यात ४८० मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी सेविका आहेत. त्यापैकी ४२८ सेविकांनी मोबाईल बॉक्समध्ये भरून पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पात जमा केले आहेत. काही सेविकांची येण्या-जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांना आंदोलनाला येता आले नाही. मात्र, त्याही लवकरच आपल्याकडील मोबाईल जमा करणार असल्याचे पानसरे म्हणाल्या.

चौकट...

राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यात पंधरा तालुक्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. तीन ते साडेतीन हजार मोबाईल प्रकल्पात जमा करण्यात आले. मोबाईल दर्जेदार हवेतच; पण महाराष्ट्रात काम करायचे आहे, मग ॲपदेखील मराठीत असायला हवे आणि दुरुस्तीचा खर्च प्रकल्पाने करावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.

- ब्रिजपालसिंह बादेल, राज्य सरचिटणीस.

(३१ सिन्नर)

सिन्नर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करीत सामूहिकरीत्या मोबाईल पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यालयात जमा करण्यात आले.

310821\31nsk_15_31082021_13.jpg

सिन्नर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करीत सामुहिकरित्या मोबाईल पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यालयात जमा करण्यात आले.