शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एकदिवसीय लाक्षणिक  संपामुळे व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:00 IST

सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते.

नाशिक : सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील सर्व सरकारी बॅँक कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला. टिळकपथ रस्त्यावरील बॅँक आॅफ महाराष्टÑसमोर सकाळी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या एकत्रीकरण धोरणाचा निषेध नोंदविला.  बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या विरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाºयांनी हा संप पुकारला होता. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला होता. बॅँकांचे एकत्रीकरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक असून, यामुळे बॅँक आणि ग्राहकांच्याही हिताचे संरक्षण होणार नाही. बॅँकिंग क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रीकरण करणे हा मार्ग नसून त्यावर सार्वत्रिक तोडगा काढणे अपेक्षित असल्याची भूमिका बॅँक संघटनांनी घेतली आहे.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका या आंदोलनात सहभागी झाल्याने सर्व बॅँकिंग व्यवहार बंद होते. विलीनीकरणामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक शाखा बंद होण्याची भीती संघटनांनी वर्तविली आहे. बॅँकांच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना असल्या तरी अजूनही ३० टक्के जनतेच्या कुठल्याच बॅँकेत खाते नाही.  त्यासाठी बॅँकांचा विस्तार होणे अपेक्षित असताना बॅँकांचे एकत्रीकरण केले तर अनेक खाती उघडलीच जाणार नाहीत, अशीदेखील एक भीती व्यक्त करण्यात आली आहे.रोजगार हिरावून घेण्याचा प्रकारएकत्रीकरणामुळे काय होऊ शकते, हे सहयोगी बॅँकांच्या स्टेट बॅँकेतील विलीनीकरणानंतर निर्माण झालेली परिस्थिती डोळ्यासमोर असताना सरकारचा एकत्रीकरणाचा निर्णय अनाकलनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एकत्रीकरणामुळे कर्मचारी, अधिकारी अतिरिक्त होतील, स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होऊन कर्मचाºयांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो, नोकरीतील सुरक्षितता संपुष्टात येऊन अनिश्चितता निर्माण होऊ शकते, रोजगार निर्मिती एकीकडे होत असताना सरकार बॅँकांमधील रोजगार कमी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :bankबँकStrikeसंप