शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

चूक १४३ रुपयांची; भुर्दंड ३५ हजारांचा

By admin | Updated: April 26, 2015 23:28 IST

जागरूक ग्राहकाचा रेल्वेला दणका : ग्राहक संरक्षण कायद्याचा घेतला आधार

नाशिक : नाशिकरोड ते बंगळुरूपर्यंतच्या मूळ अंतरामध्ये ५२ किलोमीटर अंतर वाढवून वातानुकूलित बोगीने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याकडून रेल्वेने ८० रुपये अधिक आकारले. सदरची चूक रेल्वे प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली. कारण एका जागरूक प्रवाशाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने मुख्य आरक्षण प्रशासन मध्य रेल्वे नाशिकरोड यांच्यासह मुंबई, चेन्नई आणि कर्नाटक राज्यातील हुबळी येथील रेल्वेच्या सरव्यवस्थापकांविरुद्ध थेट जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अंतिम निकालात रेल्वे प्रशासनाला एकूण ३५ हजार १४३ रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदारास अदा करण्याचा आदेश मंचाकडून देण्यात आला आहे.२०११ व २०१२ साली नाशिकरोड ते बंगळुरूपर्यंत रेल्वेने हनुमंतराव मंगलगी (७०) यांनी पत्नीसोबत वातानुकूलित बोगीने प्रवास केला होता. ११९७ किलोमीटरऐवजी तिकिटावर १२४९ किलोमीटर असे अंतर दाखविले होते. तसेच २०१३ सालीदेखील मंगलगी दाम्पत्याने नाशिकरोड ते बंगळुरू आणि बंगळुरू ते नाशिकरोड असा प्रवास केला होता. यादरम्यानही रेल्वेने आरक्षण तिकिटावर १२४९ किलोमीटर अंतर दाखविले होते. एकूणच ५२ किलोमीटरचे अंतर रेल्वेकडून वाढविण्यात येऊन पहिल्यांदा ९३, तर दुसऱ्यांदा ५० रुपये जास्तीची रक्कम तिकिटाच्या दरात रेल्वेकडून आकारण्यात आली. सदर बाब लक्षात आल्यानंतर मंगलगी यांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र लिहून जास्तीची १४३ रुपयांची रक्कम परत करण्याची विनंती केली; मात्र त्यांच्या या विनंतीकडे प्रशासनाने काणाडोळा क रणे पसंत केले. त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये एक लाख व तक्रार अर्जांचा खर्च ५० हजारांसह जास्तीची १४३ रुपयांची रक्कम परत मिळावी, अशी तक्रार त्यांनी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे ४ आॅगस्ट २०१४ साली दाखल केली. अखेरीस मंचाने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत जास्तीची १४३ रुपयांची रक्कम शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई ३० हजार व तक्रार अर्जाचा खर्च पाच हजार असे एकूण ३५ हजार १४३ रुपये अदा करण्याचा अंतिम आदेश रेल्वेला देत मुख्यमंत्री सहायता निधीमध्येदेखील ७० हजार रुपये जमा करण्यात यावेत, असेही आदेशित केले आहे. (प्रतिनिधी)