शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीमुळे अटकेत असलेल्या दीपकचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या ...

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या सांगण्यावरून थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधित क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व इतर सुरक्षासंबंधित गोपनीय माहिती सोशल मीडियावरून महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब एटीएसच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणली होती. दीपकला बेड्या ठोकल्यानंतर त्यास न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. यामुळे दीपकची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दीपकने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यात सरकारी पक्षातर्फे दहशतवादविरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला.

--चाैकशीत धक्कादायक माहिती

संशयित दीपककडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीतून अत्यंत गंभीर स्वरूपाची धक्कादायक माहिती समोर आली. एचएएलच्या भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती जी अत्यंत संवेदनशील आहे, ती पाकच्या गुप्तहेर संस्थेच्या हस्तकांपर्यंत पोहचविली. तसेच भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानातील मिसाइल व रॉकेटलाँचरबाबत तांत्रिक माहितीही उघड केल्याचे समोर येत आहे.