त्र्यंबकेश्वर : राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येवून त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.केसरकर यांच्या समवेत त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा शिवसेना नेते संतोष कदम हे उपस्थित होते. तर विश्वस्त प्रशांत गायधनी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर संपर्क प्रमुख भुषण अडसरे शहर प्रमुख सचिन दीक्षित, रावसाहेब कोठुळे, तालुका प्रमुख संपत चव्हाण आदी उपस्थित होते. पुजेचे पौराहित्य पं. लक्ष्मीकांत थेटे, मयुर थेटे यांनी केले. दरम्यान धार्मिक विधी सुरु असतांना सायंकाळचा नैवेद्य आल्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला. या दरम्यानच्या वेळेत त्यांना त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये असलेले अत्यल्प कर्मचारी, दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा, संत निवत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना व तिसरा श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आदी महत्वाच्या विषयांबरोबरच त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तिर्थ, बस स्थानक शिवाय पोलीस चौक्यांची कमतरता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली शिवसेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनेक महत्वपुर्ण बाबी केसरकर यांच्या कानावर घातल्या. सदर बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, स. पो. नि. हमंत बेंडाळे, पो. उ. नि. सुरेश चौधरी पो. उ. नि. किरण मेहर, कैलास आकुले आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.धार्मिक विधी केल्यानंतर आरती पुष्पांजली पार पडली. त्यानंतर विश्वस्त संतोष यांनी केसरकर यांना देवस्थानच्या कार्यालयात नेउन देवस्थान तर्फे स्वागत करु न त्यांचा शाल श्रीफळ भगवान त्र्यंबक राजाची प्रतिमा देउन सत्कार केला.या वेळी उपस्थितीतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अधिकारी रवी जाधव आदी उपस्थिती होते. देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.(फोटो १९ टीबीके केसरकर)
दिपक केसरकर यांनी घेतले त्र्यंबकेश्वरांचे येथे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:14 IST
त्र्यंबकेश्वर : राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येवून त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.
दिपक केसरकर यांनी घेतले त्र्यंबकेश्वरांचे येथे दर्शन
ठळक मुद्देदेवस्थान तर्फे स्वागत करु न त्यांचा शाल श्रीफळ भगवान त्र्यंबक राजाची प्रतिमा देउन सत्कार केला.