कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवला. या पार्श्वभूमीवर खास मालेगावसाठी २० हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंजूर करून घेतला. सद्या १०० खाटा ऑक्सिजन लाइनने जोडल्या आहेत. तिसरी लाट येऊ नये, आलीच तर ऑक्सिजन बेडची गरज भासू नये, गंभीर परिस्थिती ओढवल्यास सामान्य रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचेही भुसे यांनी सांगितले. कोरोनाकाळातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. रुग्णालयांचे नूतनीकरण तसेच मंजूर असलेला हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्पही लवकरच सुरू केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे रामा मिस्तरी, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले, डॉ. गौतम शिलावट, प्रशासकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, राजू अलिझाड आदी उपस्थित होते.
मालेगावी ऑक्सिजन टाकीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST