कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे वैद्यकीय अधिकारी व रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ करावी लागत होती. यापुढे कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे यांनी दिली. प्लांटच्या माध्यमातून प्रति तास २० हजार लीटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या प्लांटसाठी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. लक्ष्मी सर्जिकल ही कंपनी एक वर्ष या प्लांटची देखभाल ठेवणार आहे.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, तहसीलदार परमेश्वर कासुळे, उपनगराध्यक्ष नईम खान, संदीप गुळवे, गोरख बोडके, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ, महेश शिरोळे, वसीम सय्यद, किरण फलटनक उपस्थित होते.
इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच्या लोकार्पणप्रसंगी नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, नईम खान, डॉ अशोक थोरात, डॉ. स्वरूपा देवरे, शिवराम झोले, संदीप गुळवे, भास्कर गुंजाळ आदी. (०३ इगतपुरी ऑक्सीजन)