शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयात आरोग्य साहित्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

मालेगाव सामान्य रुग्णालयाला शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध आरोग्य सुविधांच्या साहित्याचे लोकार्पण राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री भुसे ...

मालेगाव सामान्य रुग्णालयाला शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध आरोग्य सुविधांच्या साहित्याचे लोकार्पण राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भुसे बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, सखाराम घोडके, जी. पी. बच्छाव, प्रमोद शुक्ला, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, राजेश गंगावणे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. योगेश पाटील, डॉ. शीलवंत, डॉ. राजेंद्र शिरसाठ, डॉ. पुष्कर आहेर, डॉ. सुमेध भामरे, डॉ. ओम जाधव, डॉ. आशिष अजमेरा, डॉ. वीरेंद्र पाटील, अधिसेविका रेखा माळी, बेधमुथा, स्वाती जाधव यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री भुसे यांच्या हस्ते लहान मुलांच्या ६ वॉरमर, २ फोटो थेरपी युनिट व १० लहान मुलांच्या व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, २०० खाटांची क्षमता सामान्य रुग्णालयात उपलब्ध असून, भविष्यातील गरज लक्षात घेता कॅम्प भागातही लवकरच १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालयाची गरज लक्षात घेता या इमारतीचे अजून दोन मजले वाढवून खाटांच्या क्षमतावाढीसाठी प्रयत्न केले जातील. सद्य:स्थितीत ३० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून, पैकी स्थानिक ३ रुग्ण आहेत, तर इतर भागातील २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्थानिकांसह इतर भागातील कोरोनाच्या रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम सामान्य रुग्णालयाकडून होत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून खासगी रुग्णालयांप्रमाणे नियमित स्वच्छतेवर भर द्यावा, अशी सूचना देतानाच रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांच्या सोयीसाठी शिवभोजनाची सुविधाही सामान्य रुग्णालय परिसरात उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.