शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बांबू मंडळाच्या सामायिक सुविधा केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:18 IST

कळवण : महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील देवगाव येथे उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून बांबूपासून बनविलेल्या विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे देवगाव : १८ जानेवारीपासून तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण

वनसंपत्तीने विपुल असलेल्या सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथील स्थानिकांना अवगत असलेल्या पारंपरिक हस्तकलेला आधुनिकतेची जोड प्राप्त व्हावी, त्यामुळे उपजत असलेल्या कलेचे जतन होऊन स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल, या उद्देशाने नाशिक पूर्व विभागाने महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मौजे देवगाव येथे सामायिक सुविधा केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राचे लोकार्पण राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय समन्वयक बी. पी. पवार, सुरगाणा उपविभागाचे सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, गोंदूने ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच वाडेकर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.‌ या केंद्रात बांबूपासून विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्री फोर साईड प्लेनर कट ऑफ मशीन, डिस्क सॅनडर, नॉट रिमोव्हर, पॉलिश मशीन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानिक कारागिरांना या साधनसामग्रीच्या साहाय्याने वस्तू बनविण्याकरिता दि.१८ जानेवारीपासून तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या टीममार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.दर्जेदार वस्तुनिर्मितीचे आवाहनबांबू विकास मंडळाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनसामग्रीचा स्थानिकांनी पुरेपूर व योग्य वापर करून चांगल्या दर्जाच्या शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू तयार करून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त करून गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलावा अशी अपेक्षा यावेळी महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार