पाकिस्तानचा कांदा अरब राष्ट्रात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त विकला जात असल्याने व बांग्लादेशची बॉर्डर बंद असल्यामुळे निर्यातीवर मर्यादा आली. परिणामी बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती.
सप्ताहात एकूण कांदा आवक ४४ हजार १२३ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० रुपये ते कमाल १९७६ रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक २३ हजार ८४६ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १९०१ रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.