शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

उतरती कळा तरीही पक्षाशी लळा!

By admin | Updated: January 22, 2017 00:49 IST

राष्ट्रवादी भवन गजबजले : इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ

नाशिक : जिल्ह्यातील पक्षाचे शक्तिशाली नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ तुरुंगात, पिंगळे-नागरे प्रकरणांमुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा यामुळे उतरती कळा लागलेली असतानाही राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी शनिवारी (दि.२१) पक्ष कार्यालयात  गर्दी केली आणि मरगळलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जिवात जीव आला. यावेळी १६ प्रभागांसाठी १३० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. रविवारी (दि.२२)  उर्वरित प्रभागांकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.  भुजबळांच्या अनुपस्थितीत केविलवाणी स्थिती बनलेल्या राष्ट्रवादीकडूनही महापालिका निवडणूक लढविली जाणार आहे. कॉँग्रेसबरोबर अद्याप आघाडीचा निर्णय झाला नसला तरी पक्षाने निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी प्रभाग क्रमांक १ ते ११ आणि प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ या करिता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाने स्थानिक पातळीवरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना बहाल केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस नाना महाले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, अंबादास खैरे, सुनीता निमसे, संजय खैरनार, भारत जाधव, बालम पटेल व मुक्तार शेख या पॅनलने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी १३० उमेदवारांनी हजेरी लावली. उमेदवारांकडून प्रभागाची स्थिती, निवडून येण्याची क्षमता याविषयी प्रश्न विचारण्यात आले. राष्ट्रवादीकडे १२२ जागांकरिता २५९ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.  उर्वरित प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी (दि.२२) घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर सविस्तर अहवाल येत्या २५ जानेवारीला पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.