इंदिरानगर : नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भेडसावत आहे. हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांची जणूकाही थट्टा मांडली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने नाशिक हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा कोणत्या निकषावर ठरविण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्यापही बहुतेक झोपडपट्टी परिसरात सर्रासपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळचा मार्ग म्हणूून शंभरफुटी रस्ता बनविण्यात आला. या रस्त्यावरून दिवसभर वाहनाची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सकाळ आणि सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी परिसरातील काही रहिवासी राजीवनगर झोपडपट्टी ते पिंगळेचौक आणि वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील रस्त्यावर सर्रासपणे उघड्यावर शौचास बसतात. तसेच भारतनगरलगत असलेल्या घरकुल योजनेलगतच्या रस्त्यावरही उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच मार्गक्रमण करणाºयांना नाक दाबून ये-जा करावे लागते. तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न अद्यापही काही सुटत नाही. तरीही नाशिक हगणदारीमुक्त घोषणा कसे झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हगणदारीमुक्तीची घोषणा हवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST