शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही संमेलनस्थळ, उद्घाटकांविषयी दोन दिवसांत होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:55 IST

संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंपर्क कार्यालयात बैठक : अध्यक्ष निवड, निधी संकलनावरही चर्चा

नाशिक : संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विद्रोही साहित्य संमेलन संपर्क कार्यालय म्हणजे, शेकाप कार्यालयात रविवारी (दि.२१) संमेलन संयोजन समितीची  बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्घाटक, अध्यक्ष, संमेलन नियोजन, निधीसंकलन व संमेलनस्थळ  आदी विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने उद्घाटन सोहळ्यासाठी पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांचा निर्णय दोन दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती संमेलन समितीकडून उपस्थितांना देण्यात आली. त्याचसोबत संमेलन स्थळासंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली. सुमारे तीन हजार लोक बसण्याची व्यवस्था व पन्नास बुक स्टॉलची सुविधा उपलब्ध होईल, अशी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  त्यासाठी ठिकाणांची पाहणी सुरू असून दोन दिवसांतच संमेलनस्थळ जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संमेलन निधी संकलनासाठी ‘मूठ भर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी’ या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून नाशिकरोड येथून होणार असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीला संमेलनाच्या मुख निमंत्रक प्रा.  इंदिरा आठवले, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवने, गणेश उन्हवने, व्ही.डी.जाधव, प्रभाकर धात्रक, मुख्य विश्वस्त ॲड.मनीष बस्ते, मुख्य संयोजक राजू देसले, राकेश वानखेडे, नितीन भुजबळ, नानासाहेब पटाईत, यंशवत बागुल, अर्जुन बागुल, संजय उन्हवने, देवीदास हजारे, अरुण शेजवळ, विनायक पाठारे, रविकांत शार्दुल, दादाजी बागुल, अनिल आठवले, सुशीलकुमार पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक