शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पाणीपट्टी दरवाढीचा आज फैसला

By admin | Updated: April 20, 2017 01:11 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार असून, स्थायीकडून घरपट्टी व पाणीपट्टीतील दरवाढीबाबत निर्णय होणार आहे. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाणीपट्टी दरात वाढ करण्याचे यापूर्वीच संकेत दिले आहेत, तर शिवसेनेने दरवाढीस तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. आयुक्तांनी अंदाजपत्रकात घरपट्टीमध्ये १४ टक्के तर पाणीपट्टीत प्रतीवर्षी १ टक्का दरवाढीची शिफारस केलेली आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा गुरुवारी (दि.२०) होणार आहे. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाणीपट्टीत कोणत्याही परिस्थितीत दरवाढ करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने दरवाढ करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.खुद्द भाजपामध्येच काही सदस्यांकडून खासगीत पाणीपट्टीत वाढ करण्यास विरोध दर्शविला जात आहे. महापालिकेने अगोदर वॉटर आॅडिट पूर्ण करावे, पाण्याची गळती थांबवावी तसेच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालावा, मगच पाणीपट्टीत वाढ करावी, असा मतप्रवाह नगरसेवकांमध्ये आहे. सध्या महापालिकेकडून मिळकत सर्वेक्षण सुरू असल्याने घरपट्टीबाबतही दरवाढीचा विचार करू नये, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. विरोध असतानाही सत्ताधारी भाजपा काय निर्णय घेते याकडे आता लोकप्रतिनिधींसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.