शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावरच मेळावा घेण्याचा समर्थकांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:08 IST

भगवानगडावरील दसरा मेळावा हा वंजारी समाजाला विचार व दिशा देणार असतो. समाज विकासाचे व्यासपीठ असलेल्या या मेळाव्याकडे कुणीही राजकीय दृष्टीने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला पक्षीय बिरुद लावू नये. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवानगडावरच घेण्यात येईल, अशी माहिती अखिल वंजारी विकास परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नाशिक : भगवानगडावरील दसरा मेळावा हा वंजारी समाजाला विचार व दिशा देणार असतो. समाज विकासाचे व्यासपीठ असलेल्या या मेळाव्याकडे कुणीही राजकीय दृष्टीने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला पक्षीय बिरुद लावू नये. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवानगडावरच घेण्यात येईल, अशी माहिती अखिल वंजारी विकास परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या आवारात अखिल वंजारी विकास परिषदेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक झाली. माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर विचारांचे देवाण-घेवाण सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याच्या आयोजनास गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी विरोध केला आहे. त्यामुळे वंजारी समाजात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे बैठकीत मान्यवरांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याच्या भूमिकेला अखिल वंजारी विकास परिषदेने पाठिंबा दिला असून, पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. भगवानगड हा सर्व समाजाचा असून, तेथे आलेले सर्वजण राजकीय जोडे बाजूला ठेवूनच येत असतात. गडावरील महंतांनी त्यांना परवानगी नाकारल्याने खरे राजकारणी कोण? असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे यांना परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचा महंत नामदेवशास्त्री सानप यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीस संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, एन. एम. आव्हाड, माजीमंत्री तुकाराम दिघोळे, नरेंद्र दराडे, पंढरीनाथ थोरे, उदय सांगळे, प्रभाकर धात्रक, महेश आव्हाड, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रकाश घुगे, बाळासाहेब गामणे, संपत वाघ, सुनील केदार, साहेबराव आव्हाड उपस्थित होते.