शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संप सुरूच ठेवण्याचा नाशिकमध्ये निर्णय

By admin | Updated: June 4, 2017 02:53 IST

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत यापुढे संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. दरम्यान, बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या भाजपाच्या खासदार व आमदारांना शेतकऱ्यांनी चर्चा न करताच पिटाळून लावले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी नाशिकच्या शेतकरी नेत्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत काही शेतकरी नेत्यांची झालेली बैठक व त्यातून संपाबाबत पुढील भूमिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली. जयराज सुर्यवंशी यांना संप मागे घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित करीत सूर्यवंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले. त्यावर शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याच वेळी बाजार समितीतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान सुरू करून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी संपामुळे दुकान बंद करण्याचे आवाहन केले. तथापि, शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असून, मी पैसे देऊन शेतमाल खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा दुकानातील शेतमाल फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरूच ठेवत संपाची सूत्रे नाशिकमधून हलविण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या विरोधात शेतकरी व कार्यकर्त्यांनी अशी घोषणाबाजी केली.