शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमर्यादा एक लाख करण्याचा निर्णय

By admin | Updated: June 14, 2015 23:12 IST

जिल्हा बॅँक बैठक : हिरे बंधूंसह कोकाटे अनुपस्थित

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज ८५ हजारांवरून एक लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल (दि. १३) झालेल्या जिल्हा बॅँक संचालकांच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. संचालक मंडळ निवडून आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीस दोन्ही हिरे बंधू संचालक, तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे बैठकीस अनुपस्थित होते.अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस उपाध्यक्ष सुहास कांदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अनिल कदम, आमदार जे.पी. गावित, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर, किशोर दराडे, शिवाजी चुंभळे, केदा अहेर, सचिन सावंत, नामदेव हलकंदर, परवेज कोकणी, धनंजय पवार, गणपतराव पाटील, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, कार्यकारी संचालक सुभाष देसले आदि उपस्थित होते.बैठकीत नियमित १५ विषयांवर चर्चा होऊन पाच समित्यांवर संचालक नियुक्तीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्यात आले. त्यानुसार पाच विविध प्रकारच्या समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. बॅँकेतील आर्थिक कारभार पाहण्याचे व त्या अनुषंगाने स्वाक्षरीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्याच्या विषयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. बॅँकेत १९०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १२३० कर्मचारीच कार्यरत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचे शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. जर १२३० कर्मचाऱ्यांचीच मर्यादा होते, तर मग सेवानिवृत्त झालेले १०० कर्मचारी पुन्हा वेतनावर सेवेत कशाला घेतले? अशी विचारणाही कोतवाल यांनी केली. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा ८५ हजारांवरून १ लाख रुपये करण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. कर्जमर्यादा वाढविण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात कर्ज वाटपच अडचणीत आल्याची चर्चा काही संचालकांमध्ये होती.(प्रतिनिधी)