बैठकीत एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले, नाशिक विभागाचे सहसमन्वयक सुनील दराडे, ग्रामविकासतज्ज्ञ समितीचे संघटक समाधान गायकवाड यांनी सरपंचांशी संवाद साधला. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते राहुल कराड यांची भूमिका विशद करून, एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद व त्या अंतर्गत अभ्यासपूर्वक संयोजित करण्यात येणाऱ्या एमआयटी-सरपंच संसद ग्राम या उपक्रमाविषयी योगेश पाटील यांनी माहिती दिली. ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वार्षिक कॅलेंडर या बैठकीत सरपंचांना भेट करण्यात आले. प्रकाश महाले यांनी प्रास्तविक केले. सुनील दराडे यांनी विविध उपक्रमांमागील भूमिका स्पष्ट केली. मुसळगावचे उपसरपंच अनिल शिरसाठ यांनी या बैठकीचे नियोजन केले. समाधान गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिरसाठ यांनी आभार मानले.
इन्फो...
१२ ग्रामपंचायतीचे सरपंच बैठकीत सहभागी बैठकीत जामगावच्या सरपंच जयश्री मच्छिंद्र बोडके, के.पा. वाडीचे किशोर कातकडे, गुळवंचचे भाऊसाहेब शिरसाठ, मुसळगावचे अनिल शिरसाठ, देवपूरचे प्रशांत गडाख, कारवाडीच्या अनिता जाधव, सुरेगावच्या अर्चना देशमुख, कणकोरीच्या योगीता सांगळे, पिंपळेचे संपत बिन्नर, माळवाडीच्या जयश्री आव्हाड, ठाणगावचे अशोक सदगीर व शिवडाचे प्रभाकर हारक उपस्थित होते.
फोटो ओळी: ३१मुसळगाव१
मुसळगाव येथे झालेल्या ‘एमआयटी - सरपंच संसद ग्राम’ उपक्रमात सहभागी झालेले सरपंच.
310821\31nsk_5_31082021_13.jpg
मुसळगाव येथे झालेल्या ‘एमआयटी - सरपंच संसद ग्राम’ उपक्रमात सहभागी झालेले सरपंच.