हिरावाडीतील एका मंगल कार्यालयात पंचवटी शिवजन्मोत्सव २०२१ समितीचे अध्यक्ष बाबासाहेब राजवाडे, समिती उपाध्यक्ष सतनाम राजपूत, दिगंबर मोगरे, उल्हास धनवटे, संदीप लकडे, करण टिळे, सचिव राहुल क्षीरसागर, सुरेश सोळंके, खजिनदार राकेश कदम, अमित नडगे, शाहू पवार, नीलेश आल्हाटे, यांचा सत्कार करण्यात आला. शिवजन्मोत्सव साजरा करताना नव्या पिढीला व्यवसायभिमुख शिक्षण मिळण्यासाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, पुतळा उभारण्यासाठी मदत करावी, महाराजांचे आचार-विचार पोहोचविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवजन्मोत्सव कशा पध्दतीने साजरा करावा, याविषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. तुषार जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक उद्धव निमसे, अरुण पवार, गुरुमित बग्गा, सचिन ढिकले, अजय बागुल, कविता कर्डक, नंदू पवार, बाळासाहेब कर्डक, लक्ष्मण धोत्रे, शंभू बागुल, सचिन डोंगरे, सचिन पवार, विलास जाधव, नीलेश मोरे, नरेश पाटील, धनंजय माने उपस्थित होते. (फोटो ०४ शिव)
मोठा शिवपुतळा उभारण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:24 IST