शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निमाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:01 IST

नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवाद पेटणार : विश्वस्त मंडळाने नेमली कार्यकारी समिती

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून निमा विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत शुक्रवारी (दि.३१) रोजी संपुष्टात येणार असल्याने विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निमाच्या घटनेतील कलम ३४.१ व ३४.४ नुसार विशेष कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांची, तर सरचिटणीसपदी आशिष नहार आणि खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग उपस्थित होते. या बैठकीला निमंत्रित सदस्य असलेले विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण अनुपस्थित राहिलेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समिती रविवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार निमाची निवडणूक स्थगित झाल्याने विद्यमान पदाधिकाºयांकडे काळजी वाहू पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांकडे हा निर्णय प्रलंबित आहे.

निमा विश्वस्त मंडळाने एकाधिकारशाहीचा वापर करून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे निमाची बदनामी होत आहे. हा वाद एकोप्याने मिटविणे आवश्यक आहे. वाद मिटणार नसेल तर विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निमातून बाहेर पडावे आणि राजकारण थांबवावे.सुधाकर देशमुख, सचिव, निमा

टॅग्स :businessव्यवसाय