शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार संस्था बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: September 20, 2015 22:40 IST

कळवण : सदगुरू गजानन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांची माहिती

कळवण : $ग्रामीण व शहरी भागात पतसंस्था उघडल्यानंतर त्या शासनाचा अंगीकृत एक भाग आहे असे समजून नागरिक आपल्या ठेवी ठेवतात, अडचणीत आलेल्या संस्थांमुळे ठेवीदार अडचणीत येतात त्यामुळे आता नागरिकांच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी सरकार येत्या दोन महिन्यात पतसंस्थांसाठी नवीन धोरण आखत असून, कॅरीबॅगमधील ५० हजारांहून अधिक संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.कळवण येथील श्री सदगुरु गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उद््घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री सदगुरू गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद््घाटन महंत रामलखनदास महाराज यांच्या हस्ते व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, कळवणचे माजी सरपंच अ‍ॅड. परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, उद्योगपती बेबीलाल संचेती, यादवराव पवार व अशोक पवार आदि प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, संचालक प्रकाश अहिरराव, प्रवीण कोठावदे, कैलास खैरनार, अरविंद कोठावदे, प्रशांत पगार आदिंसह संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दादा भुसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात पतसंस्थांकडे बघायचा हेतू बदलत चाललेला असताना कळवणसारख्या तालुक्यात पतसंस्था वाढीस लागत असून, कळवणमध्ये पतसंस्था व बँका यांचे कामकाज खरोखरच कौतुकास्पद आहे़ मूठभर लोकांनी सहकार बदनाम करून भ्रष्टाचार केला अशा लोकांना खड्यासारखे दूर करून सहकारात चांगल्या लोकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले़ राज्यात तीन लाख २० हजार सहकारी संस्था असून, ज्या स्थापन झाल्या आहेत, त्या उदिष्टेप्रमाणे काम करत नसणाऱ्या ५० हजारांहून अधिक कागदोपत्री असलेल्या कॅरीबॅगमधील संस्था बंद करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे यावेळी सांगितले़ खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, कागदावरील संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. आमदार जे.पी. गावित यांनी वसाका पुनर्जीवित करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत देवघरे यांनी केले. यावेळी परशुराम पगार, के. के. शिंदे, किशोर पगार हिरामण पगार, नंदकुमार खैरनार, मोहनलाल संचेती, नितीन वालखडे, प्रवीण संचेती व पतसंस्थेचे असंख्य हितचिंतक उपस्थित होते. (वार्ताहर)