शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो : डॉ. मनोज दुराईराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:29 IST

नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो

नाशिक : अवयवदान चळवळ महाराष्टÑात नक्कीच यशस्वी होऊ शकते, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून, हे शुभवर्तमान आहे; मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील हृदयरोग व अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी केले.अवयवदानाबाबत समाजमनात जनजागृतीसाठी विविध शहरांमध्ये जाऊन व्याख्यान देत दुराईराज यांनी प्रबोधनपर उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात त्यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातून अवयवदानासाठी नागरिक पुढे येत असून, त्याचा प्रत्यय पुण्यात अवयव प्रत्यारोपण करताना मागील वर्षी आला.

अवयवदानासाठी जिल्ह्यातून प्रमाण वाढावे, समाजाने मानसिकता बदलून पुढे यावे, यासाठी जनजागृतीद्वारे समज-गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून प्राथमिक सुविधा रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांची नोंदणी, स्वयंसेवी संस्थांना जोडून त्यांच्यामार्फत समाजात अवयवदान चळवळीविषयी जनजागृतीपर मेळावे, शिबिर घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.