शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

By admin | Updated: March 7, 2017 23:36 IST

सिन्नर : आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेतला.

सिन्नर : आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेतला असून, आठ दिवसांत आरटीई प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सहविचार सभेत घेण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.नाशिक येथे पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, भविष्यनिर्वाह निधी व वेतनपथक यांची सहविचार सभा पार पडली. व्यासपीठावर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, विज्ञान सल्लागार एम. एन. पाटील, वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर आदि उपस्थित होते.आठवडाभरात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आरटीई प्रमाणपत्र न दिल्यास त्यांचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार काढून घेण्याची शिफारस मुख्याधिकाऱ्यांना करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक जाधव यांनी मुख्याध्यापक संघास दिले. याबाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. शिक्षक समायोजनाचा प्रश्न दोन दिवसांत सोडविणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औताडे यांनी सांगितले.  जिल्ह्यातील ९६ विना अनुदानित शाळांचे मूल्यांकन झालेले असताना केवळ ५० शाळा २० टक्के अनुदानास शासनाने पात्र ठरविल्या आहेत, तर ४६ शाळा अनुशेषअभावी नाकारण्यात आल्या आहेत. या सर्व शाळांना त्वरित अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघ व शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी दिला आहे. डीसीपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व शाळांची पगार बिले नॉनप्लॅनमध्ये आणावी, एकाकी पद असणाऱ्या शाळांमध्ये लिपिक व शिपाई पदास मान्यता द्यावी आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.  नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक, तर एस. के. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी एस. डी. शेलार, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, गुफरान अन्सारी, माणिक मढवई, परवेझ शेख, शरद गिते, सी. पी. कुशारे, डी. एस. ठाकरे, एन. आर. देवरे, एस. के. देसले, रवींद्र जोशी, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाठ, बी. व्ही. पांडे, संग्राम करंजकर, आर. पी. शिंदे, संजय गिते, के. डी. देवढे, बी. व्ही. देवरे, एस. के. भदाणे, हेमंत पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)