शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या ‘कोर्टात’

By admin | Updated: September 9, 2016 02:06 IST

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत : स्वबळाची शक्यता; ११० जागा जिंकण्याचे टार्गेट

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने कोणाशी युती करायची? याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील, असे जाहीरपणे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युतीबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे.नाशिक महापालिकेची निवडणूक महत्त्वाची असून, उत्तर महाराष्ट्रात या निवडणुकीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व पर्याय भाजपाकडून अवलंबिले जातील, असे चित्र आहे. १२० जागांपैकी किमान ११० जागा निवडून आल्या पाहिजेत. आगामी महापौर भाजपाचा झाला पाहिजे. भाजपाचा महापौर झाल्यास त्यांच्या सत्कारासाठी आपण पुन्हा नाशिकला येऊ, असे सांगतानाच भाजपाने स्वबळाचीही चाचपणी करण्याचे अप्रत्यक्ष संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मागील निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा काही प्रमाणात पक्षाला फायदाच झाला. त्यामुळे आताही पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी भाजपाने केंद्रात व राज्यात सत्तेत युती असलेल्या शिवसेनेशी दोन हात करीत विजय मिळविल्याने पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे युती करायची की नाही? याचा निर्णय स्थानिक पातळीवर नेत्यांनी घ्यायचा आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून कोणावरही दबाव टाकला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याचे कळते. आगामी महापालिका निवडणूक ही शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने लढली जाण्याची शक्यता या बैठकीनंतर वर्तविण्यात आली. (प्रतिनिधी)