शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 1, 2017 01:11 IST

घोटी : येथील सिन्नर फाट्यावर मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून घरातील एका अपंग व्यक्तीसह त्याच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : येथील सिन्नर फाट्यावर काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका घरात घुसून घरातील एका अपंग व्यक्तीसह त्याच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला का झाला याबाबत पोलीस शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी-सिन्नर चौफुलीवर मंगेश मुरलीधर पवार यांचे रस्त्यालगत हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस ते आपल्या कुटुंबासह राहतात. आज पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागील बाजूने असलेल्या खिडकीतून प्रवेश करीत घरात झोपलेल्या मंगेश पवार व त्यांची पत्नी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान ही बाब त्यांचा मुलगा ओम याने पाहिल्यानंतर त्याने विरोध केला असता, अज्ञात हल्लेखोरांनी सर्व कुटुंबावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.अपंग व्यक्ती असलेल्या मंगेश पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक दत्तात्रय घोगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.