शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 01:05 IST

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

नाशिक : जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सिन्नर व मालेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जिल्ह्णात आजपर्यंत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील मºहळ बु. येथील संतोष कारभारी शेळके (४२) या शेतकºयाने त्याच्या भावाच्या गट नंबर ३५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. कर्जाला कंटाळून या शेतकºयाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. मºहळ बुद्रुक - सुरेगाव रस्त्यावरील शेळके वस्तीवर सदरचा प्रकार घडला. शेळके यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. शेळके यांनी शेतीसाठी विकास सोसायटीचे ७५००० रु पयाचे कर्ज घेतलेले होते. त्याच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले व आई असा परिवार आहे. वावी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. सदगीर करत आहे. अशीच घटना मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे घडली. बाजीराव त्र्यंबक भामरे (६०) या वयोवृद्ध शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या. राज्य सरकारने शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या मदतीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या रोखल्या जातील असे वाटत असताना चालू वर्षीदेखील जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्या कायम आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची दखल घेण्यात आली असून, महसूल व पोलीस खाते घटनेचे कारण शोधत आहे.