नाशिक : नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या युवकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव देवानंद जनार्दन पवार (२३, होलाराम कॉलनी) असे आहे़ देवानंद हा झाडावरील नारळ काढण्यासाठी गेला होता़ या ठिकाणी असलेल्या झाडावरील नारळ काढत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी (दि़२०) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
नारळाच्या झाडावरून पडून युवकाचा मृत्यू
By admin | Updated: March 22, 2016 00:21 IST